June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आगळगाव येथे दारूचे दुकान फोडुण एक लाख सत्तर हजाराचा ऐवज लंपास

बार्शी;

आगळगाव ता.बार्शी येथील बंद दारूचे दुकान फोडुण चोरट्यांनी दारू,सीसीटीव्ही मशीन, लॅपटॉप आदी तब्बल  एक लाख सत्तर हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उजेडात आला आहे

Advertisement

@योगेश अनिल डंमरे वय 39 वर्षे  रा.आगळगाव ता. बार्शी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या आईच्या नावे आगळगाव येथे सन 2009 पासुन हाॅटेल योगेश या नावाने बियर बार परमिंट रूम आहे.
   दि.24/01/2021 रोजी घरगुती अडचणी आल्यामुळे दि.09/02/2021 पासुन हाॅटेल बंद ठेवले होते.दुपारी 02.30 वा.चे सुमारास फिर्यादी बार्शी आगळगाव रोडने गावात जात असताना  हाॅटेलचे दार उघडे दिसले.त्यामुळे ते हॉटेलकडे गेले. त्यावेळी  समोरील दरवाजाचे कुलुप तोडलेले दिसले म्हणुन त्यांनी आतमध्ये जावून पाहीले असता त्यावेळी माल स्टॉक रूमचे कुलुप तोडलेले दिसले व त्यातील दारूचा माल व सदर रूममधील लोंखडी कपाट उघडे दिसले. त्यातिल रोख रक्कम दिसुन आली नाही तसेच शोकेस मध्ये ठेवलेला शाम्पल माल व काउंटर मधील माल दिसुन आला नाही. तसेच हटेलचे पाठीमागील दरवाजेचे कुलुप तोडलेले दिसले. हॉटेलमधील लॅपटॉप व सी.सी.टिव्ही कमेरा मशिन दिसुन आली नाही यावरून माझी खात्री झाली कि कोणी तरी अज्ञात चोरट्याने माझ्या हॉटेलमधील दारूच्या मालाची व वस्तुची तसेच रोख रक्कमेची चोरी केली आहे.

तसेच गावातील कृष्णा नवनाथ मोरे यांचे आयशर टेंम्पो नं. MH-13AX3061मधील डिझेलही कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.याबाबत अज्ञात चोरटय़ांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply