September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आगळगाव येथे जागतिक महिला दिन साजरा

बार्शी :

आगळगाव ता.बार्शी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नुतन सरपंच पूतळा गरड व महावितरणच्या अभियंत्या वर्षा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
       यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्या मनिषा उमराव थिटे, रेणूका बबन गायकवाड, रत्नमाला उत्तम विधाते, अंगणवाडी सेविका इंदूमती गायकवाड, माधूरी गिराम, अर्चना जाधव, शहाजान तांबोळी यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवा उद्योजक गोरख गरड, उप कार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत, माजी सरपंच सुरज आगळे, तंटामुक्ती अध्यक्ष शरद उकिरडे, भाजपचे सरचिटणीस मुकेश डमरे, उपसरपंच वैभव उकिरडे, दशरथ गरड, जितेंद्र गरड, सचिन खटके, आनंत कोरे, बालाजी जाधव, सचिन किरतकुडवे, गुरुराज कोल्हे, नागनाथ आगळे, राजाभाऊ गरड, बबन गायकवाड, उमराव थिटे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply