आगळगावच्या सरपंचपदी पुतळा गरड तर उपसरपंचपदी वैभव उकिरडे यांची निवड.

बार्शी;
बार्शी तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या आगळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुतळा चंद्रकांत गरड तर उपसरपंचपदी वैभव विकास उकिरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन.बी.जगताप, ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब साठे, तलाठी हरिदास ताले यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, मनिषा उमराव थिटे, रेहाना बन्सीलाल मुजावर, रेणूका बबन गायकवाड, सावित्रा भगवान डमरे, रत्नमाला उत्तम विधाते, आनंत दगडू कोरे, सचिन मोहन खटके, बालाजी प्रकाश जाधव, सचिन मिठू किरतकुडवे उपस्थित होते.
यावेळी धनराज गरड, अजय गरड, विकास उकिरडे, युवा उद्योजक गोरख गरड, माजी सरपंच सुरज आगळे, शरद उकिरडे,बाळासाहेब गायकवाड, दशरथ गरड, राजकुमार मांगलकर, दिलीप डमरे, पोपट डमरे, गणेश डमरे, दत्तात्रय गिराम, मनोज आगळे, अरुण डमरे, संतोष थिटे, शिवालिंग जमदाडे, राजाभऊ थिटे, भैरू उकिरडे उपस्थित होते.