December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ऑर्गनायझेशन चे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय मोरे यांचा साकत ग्रामस्थांकडून कशासाठी झाला सन्मान…वाचा..

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ऑर्गनायझेशन चे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय  मोरे यांनी माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी यांच्या कडे २०१८ ची ऊसाची थकीत बिले मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून ११४१८५९ रूपये मिळवून दिलेबद्दल त्यांचा साकत (पीं) ता.बार्शी येथील ऊस उत्पादक  शेतक-यांच्या वतीने   सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की साकत येथील सुमारे दहा शेतक-यांनी आटपाडी येथील साखर कारखान्यास ऊस घातला होता.मात्र कारखाना प्रशासन व इतर प्रशासनाच्या समन्वयाअभावी शेतक-यांचे लाखो रूपयांचे बिल येणे होते.दरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ऑर्गनायझेशन चे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय  मोरे यांनी यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषणे आदी विविध प्रकारची आंदोलने केली.त्यामुळे शेतक-यांचे पैसै वसुल होण्यास मदत झाली.
  यावेळी मारूती  मोरे,नवनाथ मोरे,दत्तात्रय मोरे ,प्रशांत मोरे, रावसाहेब लोखंडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply