October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अश्विनी भोसले यांना बी एड परीक्षेत सुवर्ण पदक

बार्शी;
शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शीच्या  अश्विनी अरुणराव भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मार्च/ एप्रिल २०२० मध्ये घेतलेल्या बी एड परीक्षांमध्ये  प्रथम क्रमांक संपादन केला आहे.   बी एड परीक्षांमध्ये गुणानुक्रमे पहिल्या पाच मध्ये शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या तीन प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले आहे. या उज्जवल यशाची परंपरा महाविद्यालयाने कायम राखली आहे.  समृध्द मानवी व भौतिक सुविधासह उत्कृष्ठ शिक्षक शिक्षण देणारे हे  ग्रामीण भागातील एक लोकप्रिय महाविद्यालय आहे.

Advertisement

अश्विनी भोसले यांनी बी एड परीक्षेत 9.45 CGPA प्राप्त केला आहे.  याबद्दल सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बी एड पदवीमध्ये   गुणानुक्रमे विद्यापीठात  सर्व प्रथम येणाऱ्यास  विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे  वै. रामचंद्र बाळकृष्ण बोधे अर्थात भाऊसाहेब बोधे सुवर्णपदक बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अश्विनी अरुणराव भोसले यांना प्राप्त झाले आहे.  तसेच शितल विठ्ठल लोंढे (9.18 CGPA) आणि मधुरा लक्ष्मण गुंड (9.09 CGPA) यांनी  गुणानुक्रमे तिसरा  व पाचवा क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष  नंदकुमार जगदाळे,  विष्णू पाटील, प्रकाश पाटील, दिलिप रेवडकर,  जयकुमार शितोळे,  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ एस एस गोरे, शिक्षक,पालक व विद्यार्थी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply