November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अश्विनी कणेकरने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
गौडगाव ता.बार्शी येथील कन्या अश्विनी कणेकर हिने गेट परीक्षेत पटकावला देशात प्रथम क्रमांक मिळवुन गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल तिचा गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार आला.
अश्विनी कानेकर हिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल तिच्या गावी गौडगाव ग्रामपंचायती च्या वतीने सरपंच सौ. स्वाती  पैकेकर व उपसरपंच कु. उमा शिंदे यांच्या हस्ते तिचा हार, श्रीफळ, शाल, पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
      यावेळी बालाजी पैकैकर,हिराचंद शिंदे,
राहुल भड, संजय भड,  नागनाथ काजळे,  मोहन भडसर, सुशांत सुरवसे, मदन आरगडे, काकासाहेब भड, भैय्या मगर तसेच अश्विनीचे आई वंदना कणेकर वडील सदैव कणेकर उपस्थित होते.

Advertisement

बार्शी तालुक्यातील गौडगावची कन्या व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची विद्यार्थिनी अश्विनी सहदेव कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे गौडगाव गावचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले आहे.
अश्विनी कणेकरने गेट 2021 परीक्षेत 79.67 टक्के गुणांसह बाजी मारली आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत 8 लाख 5 हजार  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
त्यात 17 टक्के रिसल्ट लागला असून अश्विनी कणेकर हिने 1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
शिक्षणाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. उच्च शिक्षण घेतले तर उच्च पदापर्यंत पोहोचता येते, त्यातून पुढे देशाची व समाजाची सेवा करता येते. हा विचार समोर ठेवत अश्विनीने गेट परिक्षेत देशात प्रथम येत आई- वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. गौडगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी कणेकरची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने वडील सहदेव कणेकर यांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला व पुढे मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.
गेट परीक्षेची तयारी करत असताना गतवर्षी कोरोना महामारीचा संसर्ग वाढला. त्यातच अश्विनीला कोरोनाने ग्रासले. तरीही ती डगमगली नाही, खचली नाही. कोरोनावर यशस्वी मात करीत जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला समोर गेली.
घरी किराणा दुकानाचा व्यवसाय असल्याने  अश्विनी कणेकरने  वेळप्रसंगी आई वंदना कणेकर व वडील सहदेव कणेकर यांना दुकान चालविण्यास मदतही केली  व अभ्यासातही सातत्य ठेवले.

Leave a Reply