October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आणि.. त्या दिड वर्षाच्या चिमुकलीने पायी चालत सर केला किल्ले रायगड

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

अवघ्या  दिड वर्षाच्या चिमुरडीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाच्या ओढीने रायगड किल्ला पायी चढुण छत्रपती शिवाजीमहाराज यांचे दर्शन घेतले.कु. शिवाज्ञा अंबरिश श्रीखंडे रा.बावी (आ) ता.बार्शी असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की किल्ला सर केलेली ही चिमुकली जेमतेम दीड वर्षाचीच आहे. तिला अजून नीट बोलताही येत नाही अथवा व्यवस्थित चालताही येत नाही.मात्र मनात जिद्द असल्यास कोणतीच गोष्ठ अशक्य नसते हीच बाब यामुळे समोर आली आहे.रायगड सर करताना शिवाज्ञा तिचा सतत तोल जात होता.चिमुकली पायरीवरून जाताना तिला उचलून घेतलं की ती रडायची व खाली सोडायला लावायची. किल्ला सर करताना ती 4-5 वेळा ती पडलीही, पण तिने चालन बंद केले नाही.येवढ्या लहान वयात धाडस दाखवत शेवटच्या पायरी पर्यंत चालली. शेवटी मेघडंबरीवर महाराजांना एकदा गारद ऐकवली.तेथे उपस्थित शिवभक्तांच्या वतीने बाल शिवभक्त शिवाज्ञा हिचा यथोचीत सन्मान करण्यात आला.
  अवघ्या दिड वर्षाच्या चिमुरडीने किल्ला सर केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम रयतेला रायगडवर जाताना त्याच्या उंचीची ,चालण्याची, सोबत मुले असण्याची जी भीती मनात आसते ती कमी होण्यास मदत होणार आहे.अगदी लहान वयातच किल्ला पायी चालत सर केल्यामुळे तिचे कौतुक होत आहे.मात्र येवढ्या लहान वयात स्वतःला सावरत तीने रायगड सर केला ही बाब एक बाप म्हणून खूप अभिमानाची व आम्हा शिवभक्तांना ती प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी चिमुकलीचे पिता अंबरिश श्रीखंडे यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply