अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुर्डुवाडी येथील एकास कारावास

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी बार्शी येथील सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजित भस्मे यांनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सोनावली आहे.
#गोपाळ उर्फ भैया दुर्योधन पाटील , वय २१ वर्षे पोलीस ठाणे कुडुवाडी असे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्याचे नाव आहे.
सरकारी वकील म्हणून अॅड.दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
आरोपी गोपाळ उर्फ भैया दुर्योधन पाटील , वय २१ वर्षे याने दि .२५ / ०३ / २०१८ रोजी अज्ञान पिडीता हीस आरोपीने त्याचे घरी बोलावून तिला मोबाईल दाखवून पिडीतेवर तेल लावून तिचेवर संभोग केला . त्यानंतर पिडीतेच्या आजोबाने पिडीतेवर झालेल्या आत्याचाराबाबत आरोपीस विचारणा केली असता आरोपीने पिडीतेच्या आजोबास मारहाण केली . त्यानंतर पिडीतेची आई हिने कुडुवाडी पोलीस येथे आरोपीविरुध्द बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४ , ६ , ८ , १२ अन्वये दि .२५ / ०३ / २०१८ रोजी गुन्हा दाखल केला .
सदर प्रकरणी आरोपी हा पिडीतेचा जवळचा नातेवाईक आहे , असे असताना आरोपीने सदर नातेसंबंधाचा विचार न करता अज्ञान पिडीतेवर अत्यंत अमानुषपणे पिडीतेचे ईच्छेविरुध्द संभोग केला . सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १० साक्षीदार तपासण्यात आले . यातील फिर्यादीची तसेच फिर्यादीचे साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच आरोपीचे घरातून जप्त करण्यात आलेली तेलाची बाटली , सतरंजी ज्या घरातून जप्त करण्यात आली त्या संदर्भाने पंचांची साक्ष महत्वाची ठरली आहे . तसेच पिडीतेच्या आजोबानी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत दिलेली साक्ष व पिडीतेच्या आईची साक्ष सदर खटल्यामध्ये महत्वाची ठरली आहे . यातील आरोपीने सदर खटला चालू असताना त्याच्या बचावामध्ये यातील पिडीतेचे कुटुंब व आरोपीचे कुटुंब यांचेमध्ये विहीरीवरुन व जमिनीवरुन वाद आहेत असा बचाव घेण्यात आला परंतु सरकारी पक्षाच्या वतीनेसदर बचाव हा पुर्णपणे चुकीचा आहे , पिडीतेचे कुटुंब व आरोपीचे कुटुंब यांचे मध्ये सध्या कोणताही वाद प्रलंबित नाही असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी केला .
सरकार पक्षाचे वतीने युक्तीवाद करण्यात आला की , आरोपीने त्याच्या जवळच्याच सदस्याविरुध्द असे अमानुष कृत्य केलेले आहे , सदर बाब सरकार पक्षाचे युक्तीवादामध्ये निदर्शनास आणुन देण्यात आली व सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहायक म्हणुन सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले . सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता विशेष जिल्हा न्यायाधीश अ.ब.भस्मे यांनी आरोपी यास बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ६ अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्त मजुरी वरु . १०,००० / – दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व ५०० / – रु दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजूरी तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम १२ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व ५०० / – रु दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली . आरोपीस भादवि कलम ३२३ अन्वये १ महीना साधा कारावास व ५०० रूपये दंड . दंड न भल्यास १० दिवस साधा कारावास व आरोपीने पिडीतेस नुकसान भरपाई पोटी रक्कम रु ५०,००० / -देणेबाबत मा.न्यायालयाने आदेश केले . सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश सुनावण्यात आले . सरकार पक्षा तर्फे अॅड . दिनेश देशमुख यांनी काम पाहीले , सदर केसमध्ये पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे , पोलीस निरीक्षक , कुडुवाडी पोलीस ठाणे यांनी तपास केलेला होता . तसेच कुडुवाडी पोलीस ठाणेचे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बोराडे व पोलीस नाईक भाउसाहेब शेळके व पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी काम पाहिले.उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. विशाल हिरे यांचे सहकार्य लाभले.