June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अलीपुरच्या सरपंचपदी अशोक मुंढे सलग तिसऱ्यांदा सत्तेत

बार्शी ;
अलीपुर ता.बार्शी या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक मुंढे तर उपसरपंचपदी अल्पना कसबे यांची निवड करण्यात आली आहे
अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडे समान सदस्य संख्या असल्याने चिठ्ठीद्वारे अशोक मुंढे यांची सरपंचपदी निवड झाली आहे अशोक मुंढे यापूर्वी उपसरपंच होते तर त्यांची पत्नी उज्वला मुंढे या पाच वर्षे सरपंच होत्या मुंढे यांची सत्तेतील तिसरी टर्म आहे निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत मुंढे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पै दीपक सुरवसे,सचिन वायकर,पत्रकार संजय बारबोले, गणेश गोडसे,सराफ व्यापारी रत्नाकर खोत,गोरख यादव, प्रमोद शिंदे, सुरेश सकट, संतोष लांडगे,राजाभाऊ माने,लहू मुंढे, संतोष हालमे,गोपाळ कोकाटे, दिलीप वायकर, तेजस सुरवसे, बप्पा माने,आदींसह नूतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

Leave a Reply