अतिव्रष्टीच्या पंचनाम्याप्रमाणे पिकविमा भरपाईची रक्कम द्यावी, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
वारंवार लेखी निवेदने देवून किंवा शांततेच्या मार्गाचा अवलंब करूनसुध्दा कोणतीच कारवाई नसल्याने आजपासून होणारे आंदोलन दि.१० जानेवारी २०२१ पासून पुणे येथील कषि आयुक्त कार्यालयासह विविध कार्याल्यावर घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयांना तहसिल कार्यालयाच्या मार्फत मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर शंकर गायकवाड, हनुमंत भोसले, गणपत भोसले, आमीन शेख, सचिन आगलावे, समाधान आगलावे, महेश पाटील, प्रशांत काळदाते आदी शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
निवेदनात सर्वच शेतकऱ्यांना अतिव्रष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्याप्रमाणे पिकविमा भरपाई देवून यापूर्वीही पिकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांना शासकिय नुकसानभरपाईचा लाभ देण्यात आलेला नाही तोही मागील अनेकवेळेचा व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. कायद्यानुसार नुकसानभरपाई व पिकविमा दोन्हींचा लाभ देणे बंधनकारक असल्याने देण्यात यावे. चालू वर्षीची अतिव्रष्टीची नुकसानभरपाईची रक्कम आपत्ती निवारण कायद्यानुसार द्यावी. सन २०१८-१९ चा दुष्काळनिधी न मिळाल्याने व्याजासह रक्कम जमा करावी. राज्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून एफआरपीनुसार रक्कम व्याजासह न दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.