अतिवृष्टीच्याअनुदानासाठी बार्शी तहसील समोर बोंबाबोंब आंदोलन

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी तालुक्यात 14 ऑक्टोबर 2020 रोजी महसूल मंडळातील वैराग 168, खांडवी 152, पानगाव 165, गौडगाव 155, नारी 160, बार्शी 158 पांगरी 122, आगळगांव 65, उपळे दुमाला 110, आणि सुर्डी 149 मि.मी. पावसाची नोंदीवरूण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे हे दिसून येते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावात शासनाने मदत जाहीर केली होती. सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये व फळबागासाठी 25 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते ते अनुदान शेतकऱ्यांना दिवाळी मध्ये दिले जाईल, अशी घोषणा शासनाने केली होती.
पण दिपावलीसन संपूण 1 महिना झाला. तरीपण अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी आंदोलन करताच तालुक्यातील 72 गांवास 401642800 कोटी रुपये एवढे अतिवृष्टीचे अनुदान धानोरे 3258100, कोरेगांव 4057000, शिराळे 4346400, हिंगणी पा 2842050, अंबाबाईवाडी 350500, जवळगाव 254200, पिंपरी पा 8519950, शेळगाव आर 11950800, हळदुगे 4606550, लाडोळे 7974300, कोरफळे 9711750, मालेगाव 6322600,
खडकोणी 2582200, सासुरे 18624350, धामणगाव दु 6152100, चिखर्डे 19402850, मुंगशी वा 7010800, रस्तापूर 738250, ऊकडगाव 5319650
घाणेगाव 9206500, वाघाचीवाडी 1047800, घोळवेवाडी 1519700, नारीवाडी 4535700, बळेवाडी 2402050, आंबेगाव 600800, चिंचखोपन 2058950, भांडेगाव 491500, वैराग 7214400, ज्योतीबावाडी 141900, तांदुळवाडी 4650700, हिंगणी आर 2534500, बार्शी 4861200, जहानपूर 2443600, मुगशी आर 4274100, सारोळे 6431500, भोईजे 6987850, येळंब 3178100, महागाव 2655950, पिंपळगाव धस 4304000, जामगाव आ 5524400, पिंपरी आर 3717300, ढोराळे 6339850, सौंदरे 8774250, काळेगाव 4063700, बोरगाव खु 2301500, बोरगाव झा 3022050, दडशिंगे 3923100, गाडेगाव 2695200, कांदलगाव 3724000, भालगांव 8888800, रूई 8887000, रातंजन 11306500, आगळगाव 4723700, गुळपोळी 11350000, चिंचोला 1665600, साकत 6842650, उंडेगांव 6641750,
रऊळगांव 4596000, कळंबवाडी पा. 1094800, झाडी 4484300,
हत्तीज 6651350, गौडगांव 9321400, झरेगाव 5279250,
श्रीपतपिंपरी 15985500, कसारी 6906750, मालवंडी 12137650,
तुर्कपिंपरी 7440300, कळंबवाडी आ 2979000, संगमनेर 4489600, पिंपळगांव पान 4462850, भातंबरे 8942700, जामगाव पा. 6914800
ह्या गावास तहसिल विभागा मार्फत बँकेस अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
आंदोलन करते वेळी राहुल भड, दशरथ उकिरडे, लता यादव, विनायकराव भोसले, विष्णू पवार, प्रभाकर कापसे, इरशाद शेख, सौदागर डांगरे, अनिरुद्ध नरवाते, मोहन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.