अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खातेवर तात्काळ जमा करा,अन्यथा आंदोलन; लक्ष्मण नाईकवाडी

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खातेवर तात्काळ जमा करावी अशी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईषारा पानगाव ता.बार्शी येथील लक्ष्मण विठ्ठल नाईकवाडी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बार्शी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की बार्शी तालुक्यात 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पानगाव व
परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अशा शेतक-यांना शासनाने मदत जाहीर
केली आहे.जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांसाठी नियोजित रक्कम त्या त्या तालुक्याला वर्ग
केली असून सदर रक्कम दिवाळीपूर्वी मिळेल अशी अशा शेतक-यांना असताना दिवाळीनंतरही
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.या प्रक्रियेत काम करणारे अधिकारी कामात
जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे अशा अधिका-यांना तात्काळ
संपर्क करुन त्यांना अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्याच्या खातेत जमा करण्यासाठी जलद कार्यवाही
करण्याचे आदेश आपण देऊन शेतकर्यांना सहकार्य करावे हि विनंती मी आपणास या अर्जाद्वारे
करत आहे.अन्यथा आम्हा शेतक-यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असही निवेदनात म्हटले आ