अखेर बार्शीच्या सामाजिक वनीकरण विभागास जाग, रोपांना पाणी देण्यास सुरुवात

बार्शी (गणेश गोडसे)
सामाजिक वनीकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शी तालुक्यात लाखो रूपये खर्चुन लागवड करण्यात आलेली रोपे करपुन जात असल्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित होताच सामाजिक वनीकरण विभागास जाग आली असुन करपुन जाणा-या रोपांना टॅकरने पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.अखेरच्या घटका मोजत असणा-या बार्शी तालुक्यातील घारी-पांगरी दरम्यानच्या रोपांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे वृक्षप्रेमीमधुन समाधान व्यक्त होत आहे.
#याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी तालुक्यातुन जाणा-या पुणे-लातुर राष्ट्रीय महामार्गावर घारी-पांगरी दरम्यान व बार्शी-उस्मानाबाद मार्गावर चिखर्डे दरम्यान सामाजिक वनीकरण विभागाच्या बार्शी परिक्षेत्राच्या वतीने 2019 मध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते.वृक्ष लागवड ते संगोपन असा तिन वर्षाचा कार्यक्रम शासनाने आखुन दिलेला आहे.मात्र सामाजिक वनीकरण विभागाकडुण पाणी, देखभाल व संगोपनासाठी पैसे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते.त्यामुळे लागवड करण्यात आलेली कांही रोपे करपुन गेली होती व इतर रोपे करपण्याच्या मार्गावर होती.
यावर सडेतोड प्रकाशझोत टाकला असता आ.राजेंद्र राऊत यांनीही वृत्ताची दखल घेऊन सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून झाडे जगली पाहिजे,पाण्याचे नियोजन करा असे सांगितले होते.बार्शी तील वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे,सचिन शिंदे यांच्या कडूनही याची दखल घेण्यात आली होती व प्रत्यक्ष पहाणीही करण्यात आली होती.
सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न बार्शीतील वृक्षप्रेमीमधुन विचारला जात होता.एकीकडे शासन नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपनावर खर्च करत असताना बार्शी तालुक्यात अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेमधुन तीव्र संताप व्यक्त होत होता.
या लागवड करण्यात आलेल्या झाडाची देखभाल सामाजिक वनीकरण विभागाने करणे आवश्यक असताना व तिन वर्ष देखभाल करणे गरजेचे असताना रोपाकाडे दुर्लक्ष केले जात होते.
#;-आ.राजेंद्र राऊत (बार्शी)
रोपे करपत असल्याबाबत निदर्शनास येताच आ.राजेंद्र राऊत यांनीही पाठपुरावा केला होता. तातडीने वरिष्ठ अधिका-यांना फोन करूण रोपे जगावी यासाठी तात्काळ पाणी द्या असे सांगितले होते.