अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी च्या वतीने ग्राहक प्रबोधन पंधरवाडाचे आयोजन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
दर वर्षी २४ डिसेंबर हा राष्टीय ग्राहक दिन म्हणुन शासकीय व जनसमान्यामध्ये सपुर्ण भारतात साजरा केला जातो. त्याच एक भाग म्हणुन या वर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी च्या वतीने लोक जागृती व्हावी तसेच ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ ची व्यापक प्रसिध्दी मिळावी म्हणुन ग्राहक प्रबोधन पंधरवाडाचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात आज मा. बार्शी शहराचे प्रथम नागरीक मा. अॅड असीफ तांबोळी यांचे हस्ते बार्शी नगर परिषद येथील जगदाळे मामा समिती सभागृहा मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका अध्यक्ष अॅड विजय नरसिंह कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे महत्व व संघटना मध्ये सहभागी होणे बाबत विचार व्यक्त केले तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका श्री अमर नाकटिळक यांनी ग्रहक पंचयतीचे ऑनलाईन सदस्य नोंदणी बाबत माहिती दिली. ते म्हणाले की सदस्य होणे साठी hptts://www.abgpindia.com/join-us/registration वर आपली नोंदणी करावी असे अहवान केले. या प्रसंगी मा. नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी, बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे पाटील, माजी नगरसेवक अशोक बोकेफोडे पाणीपुरवठा अभियंता अजय होनखांबे तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका कार्यकारणी सदस्य महेश निकम, किरण मक्के, जयंत देशमुख, अॅड. नविन सरवदे, बाळासाहेब पाटील, अमर नाकटिळक, अॅड विजय कुलकर्णी उपस्थित होते.