March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अखिल भारतीय केंद्रीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धेत बार्शीच्या सुमित पिंगळे यांचे यश

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

विनय मार्ग स्पोर्ट कॉम्पलेक्स चानक्यपुरी येथे झालेल्या अखिल भारतीय केंद्रीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा 2021 अंतर्गत 25 मार्च ते 27 मार्च 2021 या दरम्यान झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये नॅशनल डिफेन्स अॅकादमी (NDA), खडकवासला येथे कार्यरत सुमित रमेश पिंगळे, याने ग्रीको रोमन स्टाईल कुस्तीमध्ये 77 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याला यासाठी हरियाणा व तेलंगनाच्या पैलवाना बरोबर दोन कुस्त्या कराव्या लागल्या.  या टीममध्ये सुमित पिंगळे(बार्शी,सोलापुर) 77 किलो वजन गटात कांस्य पदक, शिवाजी पाटील (कोल्हापुर) 57 किलो वजन गटात सुवर्ण पदक, हिरीनाथ पाटील(कोल्हापुर) 130 किलो वजन गटात कांस्य पदक, संदिप झपाटे(कोल्हापुर) 92 किलो वजन गटात कांस्य पदकाची कमाई केली. या सर्वांनी प्रादेशिक क्रीडा मंडळ, मुंबई या टीमचे प्रतिनिधीत्व केले तर टीमचे  आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील (मुंबई) यांनी कोच म्हणुन नेतृत्व केले.पिंगळे हे बार्शी तालुक्यातील चारे येथील रहिवासी आहेत. त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply