अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या वतिने दिल्ली अंदोलनास व टॅ्क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली

बार्शी;
अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या वतिने दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले अंदोलन व टॅ्क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. हि रॅली काॅ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. हि रॅली भगवंत मैदाण येथून निघून बार्शी शहराच्या मुख्य रत्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले. यावेळी मोटारसायकवरून शेतकरी व कार्यकर्ते जय जवान जय किसान, तिन काळे कृषी कायदे रद्द करा अशा घोषणा देत होते.
यावेळी झालेल्या सभेत काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे, देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, परंतू कोणतीही तमा न बाळगता हे अंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल. यावेळी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे यांनीही विचार व्यक्त केले.