December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अकलूज येथे युवासेनेची आढावा बैठक संपन्न “गाव तिथे शाखा;बूथ तिथे युथ”-रूपेश कदम

सोलापूर;- महाराष्ट्र स्पीड न्युज
सोलापूर जिल्हा युवासेना पंढरपूर विभाग कार्यक्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अकलूज येथे आढावा बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमावेळी रूपेश कदम यांनी युवासेना हेल्पलाइन नंबर 8888724545 लोकार्पण करून कार्यक्षेत्रातील सामाजिक अडचणीसाठी स्वतंत्र नंबर देऊन कार्यपद्धती बजावून सांगितली.त्याचप्रमाणे “गाव तिथे शाखा;बूथ तिथे युथ”ही रचना सांगितली.यावेळी कदम यांनी आगामी तीन महिन्यांमध्ये कार्यकर्त्यांना शासकीय योजनांसाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यास  सांगितले.
युवासेना जिल्हाधिकारी स्वप्निल वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले युवासेनेच्या कामाचा आढावा देऊन नवीन पदाधिकारी निवडी लवकर करण्यासाठी विनंती केली तसेच आपले विचार व्यक्त करून मान्यवरांना शिवनेरी तालीमीची ओळख करून देत लोकनेते दत्ता आप्पा वाघमारे यांच्या आठवणींना उजळा दिला.
कार्यक्रमामध्ये उदय पोपट कांबळे यांचा भगवा झेंडा देऊन शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवलकुमार गाडे यांनी केले तर शेवटी आभार चंद्रकांत देवकर सर यांनी मानले
या बैठकीसाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम व युवासेना सहसचिव तथा विस्तारक विपुल पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संभाजीराजे शिंदे, युवा सेना जिल्हा युवाअधिकारी महेश देशमुख, माळशिरस तालुका प्रमुख नामदेव(नाना)वाघमारे,  सांगोला तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे,मंगळवेढा तालुकाप्रमुख तुकारामजी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
यावेळी दत्ताजी गोरे, प्रसाद भांगे, शंकर मेटकरी,नवलकुमार गाडे,  सुभाष भोसले,दिपक कसगावडे, प्रशिक्षक जयसिंग बांडगर सर,  प्रताप सरगर,अचल गांधी, रणजित गायकवाड, साई जाधव, फारुख शेख,इक्बाल मुलाणी,  यांच्यासह युवासेनेचे तालुका,उपतालुका, शहर,सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply